कस सांगू तुला , तू काय आहे माझ्यासाठी ,
शब्दांना ही काही मर्यादा असतात ना.....
तुला मांडत असताना माझा मीच हरवून जातो ,
मग काळ वेळ मर्यादा काही उरत नाही .
त्या पहिल्या भेटीपासून , शेवटच्या भेटीपर्यंत ,
मी अनादी काळ तरंगत असतो
व्यक्त-अव्यक्त भावना , आवडत्या-नावडत्या गोष्टी ,
तुझ्यासमोर मांडत असतो माझा मीच ,
पण तुझ्या डोळ्यांतील भाव , काही उमगतच नाहीत ,
शब्दांना काही मर्यादा असतात हेच खर !!!!
तुझ्यासमोर मांडत असतो माझा मीच ,
पण तुझ्या डोळ्यांतील भाव , काही उमगतच नाहीत ,
शब्दांना काही मर्यादा असतात हेच खर !!!!
No comments:
Post a Comment