दुष्काळ येथे , जल्लोष तिकडे
हाल इकडे , समृद्धी नांदे तिकडे
आमच पाणि त्यांनी पळवल ,
त्याचं पाणि यांनी पळवलं
या पळवापळवीत " माणुसकी" च पळवली जाते,
इकडे - तिकडे सगळीकडे
पाण्याच ठीक आहे हो …………
संवेदनाच थीटल्या जेथे ,
जाणिवांचा " दुष्काळ" येतो तेथे
जाणिवांचा " दुष्काळ" येतो तेथे.
No comments:
Post a Comment