Saturday, 16 February 2013

प्रेमाची गोष्ट



प्रेमाची गोष्ट



सुंदर अशी ही प्रेमाची गोष्ट ,
जशी तुझी तशी माझी पण,

प्रेमातील रुसवा-फुगवा , आनंद - दु: ख , तो हळुवारपणा
जसा तुझा तसा माझा पण

तो अबोलपणा , ती साद , ते आकाश , तो चंद्र ती चांदणी ,
जस तुझ तस माझ पण







आता गोष्ट थांबल्याची जाणीव करून देणारा दुरावा ,
हा विरह , हे अश्रू
जसे तुझे तसेच माझे पण

गोष्ट जरी थांबली , तरी प्रेम थांबत नाही
ती ओढ , नात्याचा आदर
अजूनही साद देतो अंतरातून

 जश्या तुझ्या , तश्याच माझ्या  पण ..............




No comments:

Post a Comment