भावना दाटून येता , शब्द का रुसतात कोण जाने ,
या शब्दांना भावनांची कदरच नसते जणू ,
पण , भावना व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरजच नसते ना , त्या पोहोचल्या असतात या " स्पंदनापासून " त्या "स्पंदनापर्यंत ",
अगदी "शब्दांविना " ....................
त्या पोहोचतात अव्यक्तातूनी व्यक्त होऊनी,
ओथंबून टाकतात भावविश्व सारे,
पुलकित करतात रोम रोम सारे ,
कधी हसवतात तर कधी अश्रूंचा लपंडाव खेळतात ,
अगदी "शब्दांविना"....................
No comments:
Post a Comment